Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनसलमान ‘या’ अभिनेत्रीसाठी...'ओ ओ जाने जाना'वर थिरकणार!

सलमान ‘या’ अभिनेत्रीसाठी…’ओ ओ जाने जाना’वर थिरकणार!

salman khan, isabelle kaif

सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या अफेअर्सच्या चर्चा आजही बी टाऊनमध्ये ताज्या आहेत. सलमानने कॅटला बॉलीवूडमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली असल्याचे तर जगजाहीर आहे. आता कॅटची बहिण इसाबेल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे सलमानने कॅट प्रमाणेच इसाबेलचे देखील करिअर मार्गी लावण्याचे ठरवले आहे. म्हणुनच सलमान इसाबेलच्या पहिल्याच चित्रपटात तिच्यासोबत ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

सलमानसोबत काम करण्यासाठी हिरोईन्स धडपडत असतात. सल्लुमियांचा वरदहस्त ज्या हिरोईनवर असतो तिच्या करिअरला चार चांद लागले म्हणुनच समजा. इसाबेलला तर तिच्या पहिल्याच चित्रपटात सलमान सोबत एका गाण्यासाठी का होईना पण स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे. ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘ओ ओ जाने जाना’ पुन्हा एकदा इसाबेलसाठी रिक्रिएट होणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर सलमानचा जलवा या गाण्यात पाहायला मिळणार आहे. रेमो डिसूझाच्या ‘ टाईम टू डान्स ‘ या चित्रपटातून इसाबेल सुरज पांचोली सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये ती एका बॉलरुम डान्सरची भूमिका साकारणार आहे. तर सुरज एका स्ट्रीट डान्सरच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments