Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeविदेशकुत्र्याच पिल्लू आणलं अन् ते अस्वल निघालं!

कुत्र्याच पिल्लू आणलं अन् ते अस्वल निघालं!

dog, bearबिजिंग – कुत्र्याच्या पिल्ल्याच बऱ्याच लोकांना आकर्षण असतं. त्याच्यासोबत खेळायला आणि वेळ घालवायला बरीचं लोक आवड म्हणून याकडे बघतात. प्रत्येकजण कुत्र्याच्या लहान पिलाकडे आकर्षित होतात आणि घरी आणतात. चीनमध्ये असाच प्रकार घडला. एका व्यक्तीनं कुत्राच पिल्लू म्हणून घरी आणलयं.? आणि तो अस्वल निघालं.

न्यू चायना टीव्हीच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीला २०१५ मध्ये डोंगरामध्ये एक काळ्या रंगाचे पिल्लू भटकताना दिसले. त्याने त्या भटकत असलेल्या पिल्ल्याला कुत्र्याचे पिल्लू समजून घेऊन आला. त्या पिल्ल्याला तो दररोज दूध पाजत असे आणि दररोज खाण्याकडे तो जातीने लक्ष घालत होता. असे काही दिवस सुरु असताना अचानक एकदिवशी ते पिल्लू दोन पाय चालत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याच्या पायाखालील जमीनच सरकली. तो अस्वस्थ झाला. कारण ते पिल्लू फक्त आठ महिन्याचे होते अन् त्याचे वजन ८० किलो आणि लांबी २ मीटर होती. त्यावेळी त्या व्यक्तीला समजून चुकले, की आपण आणलेलं पिल्लू कुत्र्याचे नसून अस्वलाचे आहे. याचीच सर्वत्र चर्चा होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments