Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रडहाणूतील विशाल ट्रेडर्स मॉल अग्नितांडवात एकाचा मृत्यू!

डहाणूतील विशाल ट्रेडर्स मॉल अग्नितांडवात एकाचा मृत्यू!

fire, vishal traders, kasaपालघर : डहाणूतील कासा या ठिकाणी असलेल्या विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागली आहे. या मॉलमधून सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एकजण मॉलमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होते आहे. तेलाचे ड्रम, धान्य गोदाम असल्याने आग आणखी वाढली होती.

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. विशाल ट्रेडर्स ही दोन मजली इमारत आहे. कासा शहरातील हा मोठा मॉल आहे. पहाटे तीनच्या दरम्यान अचानक आग लागली होती. ग्राऊंड फ्लोअरवर मॉल, पहिल्या मजल्यावर गोडाऊन्स आणि दुसऱ्या मजल्यावर रहिवासी घरे या इमारतीत आहेत. आग नेमकी कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य बाजारपेठेत हा मॉल असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोचू नये म्हणून अग्निशमन दलाकडून विशेष काळजी घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments