skip to content
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यहे पदार्थ टाळा किडनी स्टोन दूर होईल!

हे पदार्थ टाळा किडनी स्टोन दूर होईल!

आज किडनी स्टोनने बरेचं जण ग्रासलेले आहेत. ही समस्या गंभीर होत चालली आहे. परंतु, योग्य आहाराने हा आजार दूर करता येतो. काही पदार्थांचा आहारातील समावेश टाळल्यास बराच आराम मिळू शकतो. ‘या’ गोष्टींची घ्या काळजी घेतल्यास निश्चितच फायदा होईल.

१.भरपूर पाणी प्या. त्यामुळे किडनीत स्टोन तयार होण्याची भीती कमी होते.
२.जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करा. त्यामुळे मूत्रातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी रहाते. ३.सोडिअमचे प्रमाण जास्त असलेला आहार घेणे टाळा. नमकीन स्नॅक्स, प्रोसेस्ट मीट, नूडल्स   खाणे टाळा.
४.स्ट्रोबेरी, शेंगदाणे, पालक, चहा यांमध्ये ऑक्झॅलिक अॅसिड असते. हे खाणे शक्यतो टाळा.
५. आपले शरीर व्हिटॅमिन सी चे रुपांतर ऑक्झॅलिक अॅसिडमध्ये करते. ऑक्झॅलिक अॅसिडमुळे किडनी स्टोन तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने व्हिटॅमिन व मिनरल्सचे जास्त प्रमाण असलेले अन्न खाणे टाळा.
६.साखरेच्या खाण्याने कॅल्शिअमचे स्टोन तयार होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे किडनी स्टोन असणाऱ्यांनी साखर असलेले पदार्थ खाणे टाळा.
७.मांस व प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळा. यामुळे कॅल्शिअमचे स्टोन होण्याचा धोका असतो.
८.बऱ्याच डेअरी प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्झॅलिक अॅसिड असते. त्यामुळे चहा, चॉकलेट खाणे टाळा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments