नागपूर : नागपूर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अधिका-यांसाठी नवीन फरमान काढले आहेत. प्रत्येक विभागप्रमुख आणि अधिका-यांनी कामे करावीत. यापुढे जीन्स पॅंट घालून कार्यालयात येऊ नका. नीटनेटके रहा. असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाचा चांगलाच धसका घेतला आहे.
तुकाराम मुंडे यांची डॅशींग अधिकारी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे मुंडे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी कामचुकार अधिकारी कर्मचा-यांची गोची होते. मुंडे यांनी नागपूर महापालिकेचे पदभार स्विकारला त्या दिवसापासून कामामध्ये शिस्त आली आहे. अधिकारी, कर्मचारी सगळेच कामात व्यस्त झाले आहेत. विशेष म्हणजे मुंडे यांनी यापुढे महापालिकेत जीन्स पॅंट घालून येण्यावर बंदी असल्यामुळे अधिकारी, कर्मचा-यांना आता फॉर्मल शर्ट पॅन्ट घालुनच कार्यालय गाठावे लागणार आहे.