Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रघोटाळेबाज नीरव मोदींच्या मालमत्तांचा गुरुवारी ई लिलाव

घोटाळेबाज नीरव मोदींच्या मालमत्तांचा गुरुवारी ई लिलाव

nirav-modiमुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जप्त मालमत्तांचा गुरुवारी ईलिलाव होणार आहे. दोन टप्प्यात नीरव मोदींच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यामध्ये आलिशान मोटारी, सोने, आणि हिऱ्यांनी मढवलेली महागडी घड्याळे यांची विक्री केली जाणार आहे.

लिलावत ११२ वस्तूंची विक्री होणार…

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी याला विशेष पीएमएलए न्यायालयानं यापूर्वीच परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या संपत्तीचा ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. या लिलावात ११२ वस्तूंची विक्री केली जाईल. अशीही माहिती समोर आली आहे.

लिलावाचा पहिला टप्पा गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी पार पडेल. Saffronart या कंपनीकडून हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यात ४० लॉट्स असून १५ महागडी पेंटिंग्ज आहेत. एम. एफ हुसेन, अम्रिता शेरगिल यांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश असून त्यांची किंमत १२ ते १८ कोटींच्या घरात आहे. याशिवाय व्ही. एस गायतोंडे यांचेही पेंटिंग्ज असून त्याची किंमत ७ ते ९ कोटींच्या दरम्यान आहे. मनजीत बावा, राजा रवी वर्मा, अर्पिता सिंग गणेश पायने, के. के. हेब्बर, विश्वनाथ नागेशकर, सुधांशु चौधरी आणि शान भटनागर यांच्या चित्रांचा लिलाव केला जाणार आहे.

लिलावाचा दुसरा टप्पा ३ आणि ४ मार्चला…

नीरव मोदी याच्या रोल्स रॉइस घोस्ट या आलिशान मोटारीची लिलावात विक्री केली जाणार आहे. यातून ७५ ते ९५ लाख रुपये अपेक्षित आहेत. तसेच पोर्शे मोटार, सोने आणि हिऱ्यांनी मढवलेली डझनभर महागडी घड्याळे , हॅण्डबॅग्ज यांची विक्री केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात ३ आणि ४ मार्च रोजी आणखी काही वस्तूंचा लिलाव होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments