Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनCAA विरोधात आंदोलनात सहभागी व्हा; जावेद जाफरीच आवाहन

CAA विरोधात आंदोलनात सहभागी व्हा; जावेद जाफरीच आवाहन

javed-jaffar-appeals-to-take-part-in-the-caa-protest-movementमुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा ( CAA ) लागू झाल्यानंतर या विरोधात देशभरात आंदोलन केलं जात आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. आता या कायद्याविरोधात आज १९ डिसेंबर दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन होणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांनी ट्विटव्दारे केले आहे.

या आंदोलनात अठराहून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र येऊन मोदी सरकार विरुद्ध आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात बॉलिवूड कलाकारही सहभागी होणार आहेत. बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीनं याविषयी ट्विट करत आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. ‘ज्या मुंबईकरांना खरंच काळजी वाटते, त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे,’ असं त्यानं ट्विट करत म्हटले आहे.

या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या आंदोलनात लेखक, कवी, पत्रकार तसेच विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी रेणुका शहाणे, हुमा खुरेशी, स्वरा भास्कर यांच्यासह फरहान अख्तर, सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, अनेक कलाकारांनी नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थांनी सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिम विरोधी आहे, असं म्हणत आंदोलन केले होतं. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याविरोधात देखील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले होतं.

देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असल्यामुळे सरकार समोर आता पेच निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments