Saturday, May 4, 2024
Homeदेशअनुराग ठाकुरसह कपिल मिश्रा, परवेश वर्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

अनुराग ठाकुरसह कपिल मिश्रा, परवेश वर्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने प्रक्षोभ भाषणा प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा आणि खासदार परवेश वर्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्या. अशा शब्दात सुनावले.

“कपिल मिश्रांचा प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला नाही यावर कसा विश्वास ठेवणार?”

दिल्ली हिंसेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कामावर गंभीर ताशेरे ओढले. न्यायालयातच कपिल मिश्रा यांचा प्रक्षोभक भाषण देतानाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावर तुम्ही हा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहात आहात यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न न्यायालयाने विचारला. विशेष म्हणजे प्रक्षोभक भाषण देताना उत्तर-पूर्व भागाचे डीसीपी कपिल मिश्रा यांच्याशेजारी उभे होते.

न्यायालयाने पोलिसांना विचारलं की दिल्लीत दिले गेलेल्या प्रक्षोभक भाषणांचे संबंधित तीन व्हिडीओ तुम्ही पाहिले आहे का? यावर पोलिसांनी २ व्हिडीओ पाहिले आहेत. एक नाही. यावर न्यायालयाने गंभीर नाराजी व्यक्त करत संबंधित व्हिडीओ टीव्ही चॅनलवर अनेकदा दाखवण्यात आला आहे. तरीही तुम्ही तो पाहिला नाही यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? असा थेट सवाल केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments