Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमहाराष्ट्रात NRC कायदा लागू होणार नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात NRC कायदा लागू होणार नाही – उद्धव ठाकरे

मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’

Uddhav Thackeray CAA,Uddhav Thackeray, CAA,Uddhav, Thackerayमुंबई : ‘नागरीकत्व सिद्धं करणं  (NRC) हा  कायदा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’ त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा प्रोमो हा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा तीसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोत CAA संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं उत्तर दिलं. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून CAA संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

या राज्यांनी CAA ला विरोध केला…

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आल्यानंतर देशात अनेक ठिकाणी याला विरोध होत आहेत. केरळ राज्यसरकारने नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. नागरिकत्व कायद्याविरोधात आव्हान याचिका दाखल करणारे केरळ हे पहिलं राज्य ठरलं आहे. पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments