नाशिक : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्वादीला सोडचिठ्ठी दिली. शिवबंधन बांधले आणि उमेदवारी मिळवली. अर्ज केल्यानंतर दोन तासानंतर मातोश्रीवरुन दुस-या नेत्याला उमेदवारी जाहीर झाली. हा प्रकार घडला नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात.
माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. अर्जही भरला. परंतु अंतर्गत वादामुळे ऐन वेळेवर मातोश्रीवरून उमेदवार बदलला. महालेच्या ऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी देण्यात आली.
धनराज महाले यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. भास्कर गावित यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महाले समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून गोंधळ उडाला असल्याचे दिसून येत आहे.