Sunday, May 5, 2024
Homeक्रीडावेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारत सज्ज

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारत सज्ज

आयसीसीने आता कसोटीतही खेळाडूंच्या पाठिवर नंबर असलेली जर्सी अनिवार्य केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार कसोटी इतिहासात पहिल्यांदाच नंबर असलेली जर्सी परिधान करणार आहेत.

अँटिग्वा: विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे विंडीजविरुद्धच्या उद्याच्या अँटिग्वा कसोटीत टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये उतरणार आहे.

आयसीसीने आता कसोटीतही खेळाडूंच्या पाठिवर नंबर असलेली जर्सी अनिवार्य केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार कसोटी इतिहासात पहिल्यांदाच नंबर असलेली जर्सी परिधान करणार आहेत. नंबर असलेली जर्सी घातलेले टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान, पहिल्या कसोटीआधीच्या सराव सामन्यात टीम इंडियाने विंडीज(अ) संघावर वर्चस्व गाजवलं होतं. चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने फलंदाजीत कमाल केली होती. तर कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरली होती. त्यामुळे अँटिग्वाच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया विंडीजवर वर्चस्व गाजवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ खालील प्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments