Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्यानेपाळच्या नव्या पंतप्रधानपदी पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांची नियुक्ती

नेपाळच्या नव्या पंतप्रधानपदी पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची नियुक्ती

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी सेंटर) पुष्प कमल दहल उद्या दुपारी ४ वाजता (स्थानिक वेळेनुसार) नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.

Nepal Prime Minister Pushpa Kumar Dahal Prachand नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी रविवारी माओवादी सेंटरचे नेते पुष्प कमल दहल उर्फ ‘प्रचंड’ यांची आज नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. “नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी सेंटर) पुष्प कमल दहल उद्या दुपारी ४ वाजता (स्थानिक वेळेनुसार) नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील,” नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नवीन सरकार स्थापन करण्यासाठी संसदेच्या १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर दहल यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. दहल यांनी २००८ ते २००९ आणि पुन्हा २०१६ ते २०१७ पर्यंत नेपाळचे पंतप्रधान म्हणून काम केले.

सुरुवातीला, सहा पक्षांच्या युतीने पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच प्रचंड यांनी राष्ट्रपतींकडे नेपाळच्या पंतप्रधानपदाचा दावा करणारा अर्ज केला.

“६ पक्षांच्या युतीने पुष्पकमल दहल यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दहल अडीच वर्षे सरकारचे नेतृत्व करतील आणि उरलेल्या दोन वर्षांत सीपीएन-यूएमएल सत्तेत असेल,” नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी सेंटर) नेते वर्षामान पुन म्हणाले.

नव्या युतीमध्ये सीपीएन-यूएमएलचे ७८, माओवादी सेंटरचे ३२, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे २०, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे १४, जनता समाजवादी पक्षाचे १२, जनता पक्षाचे ६, नागरिक उन्मुक्ती पक्षाचे ४ खासदार आणि ३ अपक्ष आमदार प्रचंड यांच्या समर्थनार्थ आहेत. . पुष्पकमल दहल यांना आता १६९ खासदारांचा पाठिंबा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments