Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘कोरोनाचा’ एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री टोपे

महाराष्ट्रात ‘कोरोनाचा’ एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री टोपे

Rajesh Tope,Rajesh, Tope,Marathwada,Maharashtra, Cabinet,Expansion

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधील ६५ हजार ६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात सध्या चार जण तर पुण्याच्या नायडू रुग्णालयात दोन जण भरती आहे. आतापर्यंत १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह निघाले. भरती झालेल्या १५२ प्रवाशांपैकी १४६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व शहरांमध्ये जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, तिथेही दक्षता घेण्यात येत आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments