डिस्कव्हरी चॅनेलवरील ‘man vs wild’ कार्यक्रमात सुपरस्टार रजनीकांत झळकणार आहे. या कार्यक्रमाच्या ‘Into the Wild’ या विशेष भागच चित्रीकरण गेल्या महिन्यात कर्नाटकातील बांदीपुराच्या जंगलात पार पडलं होतं. यासाठी बेयर ग्रिल्स जानेवारी महिन्यात भारतात आला होता. हा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर या विशेष भागाच्या प्रदर्शनाची तारीख डिस्कव्हरी चॅनेलने टीझर प्रदर्शित करून जाहीर केली आहे.
२३ मार्चला रात्री ८ वाजता ‘Into the Wild’ या कार्यक्राचा विशेष भाग डिस्कव्हरीवर पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्यासोबत बेयर ग्रिल्सने चित्रीकरण केलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट 2019 रोजी बेयर ग्रिल्सच्या प्रसिद्ध ‘मॅन vs वाइल्ड’ या शोमध्ये झळकले होते. त्याचप्रमाणे ‘Into the Wild’ च्या विशेष भागात अक्षय कुमारही दिसणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
Gear up to venture into the wilderness of India with survival expert @BearGrylls and the ultimate superstar @Rajinikanth in an action packed adventure. Premieres 23 March at 8 PM, only on Discovery #ThalaivaOnDiscovery pic.twitter.com/zSS4GsSCL4
— Discovery Channel IN (@DiscoveryIN) February 27, 2020
बांदीपुरा राष्ट्रीय उद्यान (कर्नाटक)
बांदीपुरा राष्ट्रीय उद्यान हे 1974 मध्ये स्थापन केले गेले. बांदीपूर उद्यान हे अंदाजे 874.2 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. ते चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट तालुक्यात आहे. म्हैसूर शहरापासून ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. सुरुवातीला हि जागा म्हैसूरच्या राजाच्या खासगी शिकारीसाठीची होती. कालांतराने या जागेला बांदीपुरा व्याघ्र प्रकल्पात रुपांतरीत केले गेले.
पीएम मोदी आणि ‘मॅन vs वाइल्ड’
पीएम नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट 2019 रोजी बेयर ग्रिल्सच्या प्रसिद्ध ‘मॅन vs वाइल्ड’ या शोमध्ये झळकले होते. पीएम मोदीबरोबर ‘मॅन vs वाइल्ड’ या भागाचे चित्रीकरण उत्तराखंडच्या जिम कार्बेटच्या जंगलात करण्यात आले होते. हा कार्यक्रम जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन कार्यक्रम ठरला होता. या शो दरम्यान ग्रिल्स आणि पीएम मोदी यांच्यात अनेक मनोरंजक किस्से शेअर करण्यात आले होते. आत्ता सुपरस्टार रजनीकांत या शोमधून झळकणार आहे या निमित्ताने चाहत्यांमध्ये उसुक्ता वाढली आहे.