उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी चाकू हाताने अडवल्यामुळे तो त्यांच्या पोटात शिरला नाही. हाताला दुखापत झाली. ओमराजेंचे प्राण वाचले. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं घडली.
प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे यांच्यावर हल्ला झाला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. पवनराजेंच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले. वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला. या चाकू हल्ल्यात ओमराजे यांच्या हाताला दुखापत झाली.