Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशबापरे! मोदींच्या वाढदिवसानिमित्त 700 फूट लांबीचा 7 हजार किलोंचा अनोखा केक!

बापरे! मोदींच्या वाढदिवसानिमित्त 700 फूट लांबीचा 7 हजार किलोंचा अनोखा केक!

सुरत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त गुजरातमधील सुरतमध्ये एका बेकरीत 700 फूट लांबीचा आणि 7 हजार किलोंचा केक तयार करण्यात आला. या अनोख्या केकची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचे सुरत येथील ‘ब्रेडलाईनर बेकरी’ने ठरवले आहे. त्यामुळे 7 हजार किलो वजनाचा आणि 700 फूट लांबीचा केक तयार केला आहे. सुरतमधील 700 प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येईल असंही ब्रेडलाईनर बेकरीच्या मालकांनी सांगितलं. भ्रष्टाचारमुक्त भारत ही या केकची थीम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 7 हजार किलोंचा जो केक तयार करण्यात येणार आणि जे सेलिब्रेशन होणार आहे त्यासाठी हजारोंच्या संख्येने मोदी समर्थक उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असं ब्रेडलाईनर बेकरीचे नितीन पटेल यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वांना हा केक बघण्याची उत्सुकता लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments