Monday, May 6, 2024
Homeविदेशपाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना समर्थन देणार; फुटीरतावाद्यांना पाठिंबा

पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना समर्थन देणार; फुटीरतावाद्यांना पाठिंबा

इस्लामाबाद -भारतीय सैन्य कमांडर्सच्या ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ६ दिवसीय संमेलनापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषा, काश्मीर आणि देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यात भारताच्या सीमेवर शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरदेखील चर्चा झाली. पाकिस्तानच्या सैन्यातील मुख्य कमांडर्सची मंगळवारी बैठक झाली. ही बैठक ७ तास सुरू होती. काश्मीरविषयी निर्णय स्वातंत्र्य असावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे अशा रीतीने काश्मीर फुटीरतावाद्यांविषयी पाकने चर्चा केली. त्यांचा त्यासाठी लढा सुरू आहे. त्यांना समर्थन देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या लष्कराने घेतला आहे. काश्मीरमधील अतिरेक्यांना साहाय्य करण्याचे धोरण उघडपणे स्वीकारण्यात आले आहे. ‘डॉन’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय आणि कुटनीतीच्या स्तरावर पाकिस्तानी सैन्य स्वतंत्र काश्मीरवाद्यांना समर्थन देणार आहे. स्पेशल कॉप्स कमांडर्स कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेतल्याचे वृत्त डॉनने प्रकाशित केले.

चीनच्या सीमेवर डोकलाम वाद, चीन आणि पाकिस्तान सीमेसहित राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर भारताच्या उच्च सैन्याधिकाऱ्यांची ६ दिवसीय बैठक ९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. त्याच वेळी पाक सैन्याने आपले धोरण स्पष्ट केले.

सैन्याचे अधिकृत वक्तव्य नाही ही बैठक ७ तास सुरू होती. सैन्याने माध्यमांना याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नाही. सैन्याची जनसंपर्क यंत्रणा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने कोणतेही अधिकृत वक्तव्य न देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीत जनरल बाजवा यांच्या काबूल दौऱ्याविषयी चर्चा झाली. त्यांनी अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांची या दौऱ्यादरम्यान भेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments