लखनऊ: नोटबंदीला वर्षपूर्ती झाली. त्यानंतरही जुन्या नोटांचं घबाड काही संपताना दिसत नाही. कानपूरमध्ये तब्बल १०० कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटा गादीमध्ये होत्या. अशा तीन गाद्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
एका बिल्डर आणि कपडा व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतलं आहे. यात जुन्या नोटा बदलून देणाऱ्यांचं रॅकेट असल्याचा संशय आहे. कानपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा असल्याची माहिती कानपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून आधी ८० कोटीच्या नोटा जप्त केल्या. आता हा आकडा १०० कोटीपर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे अटक केलेल्यांपैकी एकाचा नातेवाईक RBI चा कर्मचारी आहे.
युपीत १०० कोटीच्या जुन्या नोटा सापडल्या
RELATED ARTICLES