Tuesday, June 16, 2026
Homeपाककलापिठाच्या ढोकळा तुम्ही वेगळी चव म्हणून करु शकाल

पिठाच्या ढोकळा तुम्ही वेगळी चव म्हणून करु शकाल

 जिन्नस

  • २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
  • १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट
  • २ वाट्या आंबटसर ताक
  • मीठ
  • मिरची
  • आले
  • जिरे
  • खायचा सोडा

पाककृती

सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments