Sunday, August 16, 2026
Homeमुख्य बातम्याVIDEO : महानगरपालिकेत दोन नगरसेवकांनी घेतलं चुंबन!

VIDEO : महानगरपालिकेत दोन नगरसेवकांनी घेतलं चुंबन!

Kolhapur Municipal Corporation,Kolhapur, Municipal, Corporation,Kolhapur Corporation,Kolhapur Municipalकोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात धक्कादायक प्रकार घडला. दोन पुरुष नगरसेवकांनी एकमेकांचं चुंबन घेतल्याचं दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार चक्क सभागृहात घडला असून तेथे महिला नगरसेविकाही उपस्थित होत्या.

कोल्हापूर महापालिकेत पालिकेचं नियमित काम सुरू होतं. तेव्हाच चेष्टा मस्करीमधून एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाच्या गालाचे चुंबन घेतलं. यामध्ये दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या गालाचे चुंबन ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे या नगरसेवकानं घेतलं.

महापालिकेत सभा सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानंतर सर्व नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, महापालिकेत महिला नगरसेवकांच्या समोरच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक ठिकाणी जबाबदारपणे वर्तन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र कोल्हापूरमध्ये नगरसेवकांनी थेट महापालिकेतच केलेल्या या कृत्यानंतर आता टीका होत असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments