
कोराकेंद्र, मुंबई येथे सुरू झालेल्या चातुर्मास्य कालावधीतील १०० कुंडी गो-प्रतिष्ठा महायज्ञाचे भव्य उद्घाटन ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य परमपूज्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात संपन्न झाले. हा यज्ञ केवळ धार्मिक विधी नसून, गौसंरक्षण, सनातन धर्माचे मूल्य आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेच्या पुनर्स्थापनेचा एक व्यापक प्रयत्न आहे.
या महायज्ञाचे नेतृत्व काशी (महाराष्ट्र) चे कृष्ण यजुर्वेदाचार्य पं. श्री वीरेश्वर दातार करत आहेत. आचार्य पं. अनिमेष व आचार्य पं. सुधीर यांचेही या यज्ञामध्ये विशेष योगदान आहे. परमाराध्याच्या वतीने ब्रह्मचारी परमात्मानंदजी यज्ञकर्माचा प्रमुख संकल्प साकारणारे आहेत. संपूर्ण देशभरातून आलेले नामवंत वैदिक आचार्य, पंडित आणि मुंबईतील प्रमुख विद्वानांचा सहभाग या यज्ञात दिसून येतो. संपूर्ण चातुर्मास्यात दररोज सकाळी ९ वाजता यज्ञ सुरू होईल.
यज्ञात देश-विदेशातील सनातनी भक्तांचा सहभाग सुलभ व्हावा यासाठी आयोजकांनी एक विशेष मोबाईल ॲप देखील तयार केले आहे. या माध्यमातून भक्तगण ऑनलाइन सहभाग नोंदवू शकतात व यज्ञासाठी सहकार्य करू शकतात.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज गौप्रतिष्ठान आंदोलनाचे प्रभावी नेतृत्व करत असून, गौहत्या या विषयावर ते अत्यंत स्पष्ट भूमिका घेतात. त्यांनी सरकारकडे आवाहन केले आहे की, गायीला प्राणी म्हणून न पाहता ती राष्ट्रमाता घोषित करावी आणि तिचे रक्षण सुनिश्चित करावे. “गाय ही आमच्यासाठी केवळ प्राणी नाही, ती देवता आहे, ती माता आहे. म्हणून तिचे स्थान प्राण्यांच्या यादीतून काढून, राष्ट्रदेवतेचे दर्जा मिळावा हीच आमची मागणी आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “एकदा कायद्याने गाय ही माता असल्याचे मान्य झाले, की समाजाचं दृष्टिकोनही बदलेल.”
त्यांनी आजच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सांगितले की, “आम्ही सनातनी लोक आपल्या भोजनातली पहिली पोळी ‘गौमातेसाठी’ काढतो, पण हे दुर्दैव आहे की तिची कत्तल होते. याहून मोठे शत्रूंचे यश काय असू शकते?”
या आध्यात्मिक उद्गारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कृषी विभागाचा (USDA) अहवाल एक भीषण वास्तव मांडतो — तो म्हणतो की २०२५ मध्ये भारतातील गोमांस (मुख्यतः म्हशीचे मांस) उत्पादन आणि निर्यात वाढणार आहे. ३०७.५ कोटींच्या वर असलेली भारतातील गोवंश संख्या व सुमारे ४१.४१ दशलक्ष कत्तलीसाठी तयार असलेले गोवंश, हे आपल्यासाठी चिंता निर्माण करणारे आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे आवाहन केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय अस्मितेशी निगडित आहे. जे कोणी सनातन धर्माचे पालन करणारे आहेत, भारतीय परंपरेचे जतन करु इच्छितात आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा असे मानतात, त्यांनी या महायज्ञात प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन सहभाग घेऊन या चळवळीस बळ द्यावे.
ही केवळ यज्ञकृती नाही, तर भारताच्या आत्म्याच्या रक्षणासाठी दिलेली एक सामूहिक साकडेप्रार्थना आहे. स्वामीजींसोबत उभं राहा, गोमातेचे रक्षण करा, सनातन धर्माची ज्योत प्रज्वलित ठेवा!
भारताला पुन्हा संस्कृतीसंपन्न, धर्मनिष्ठ राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या सहभागाची आज सर्वाधिक गरज आहे.

