Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनVIDEO : मलायकाने हे काय घातलंय!

VIDEO : मलायकाने हे काय घातलंय!

Malaika Arora Khan,Malaika, Arora, Khan,Malaika Aroraमुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते. अर्जुन कपूरसोबतचं तिचं नातं तर बी टाऊनमधला सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या दोघांच्या वयात जवळपास ११ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं पण यासोबतच मलायका अनेकादा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरुनही ट्रोल होते. आताही तिच्यासोबत असंच काहीसं झालं आहे. ज्यामुळे तिला पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

Spaceman take me up with you as there is a pandemic 😢. #malaikaarora 🎼 #jassmann @babylonzoo.official #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी मिळता जुळता…

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती जिम आउटफिट्समध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नालिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका जीममध्ये जाताना दिसत आहे. मात्र तिच्या जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी एवढा मिळता जुळता आहे की त्यामुळे सर्वच संभ्रमात आहे. याच लुकवरुन मलायकाला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.

काही युजर्सनी मलायकाला निदान तुझं वय काय आहे हे बघून फॅशन कर असा सल्ला दिला आहे. काही युजर्सनी मलायकाची तुलना किम कर्दाशियनशी करत, तिला भारताची स्वस्तातली किम कर्दाशियन असं म्हटलं आहे. तर काही खरंच मलायकानं कपडे घातले आहेत का? असा प्रश्न केला आहे. मलायकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. मलायका नेहमीच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून अनेकदा ती तिचे योगा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments