Tuesday, June 16, 2026
Homeमनोरंजनअभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ती केवळ २८ वर्षांची होती. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं.

चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने आत्महत्या केली. चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला.

नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचं हेमंतने सांगितलं.

“शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments