Tuesday, May 19, 2026
Homeमनोरंजनअनुष्का विराटच्या घरी ‘परी’चे आगमन,चाहत्यांना दिली गोड बातमी

अनुष्का विराटच्या घरी ‘परी’चे आगमन,चाहत्यांना दिली गोड बातमी

क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.

विराटने ही आनंदाची बातमी सांगताच सोशल मीडियावर नेटकरी, चाहते व सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सायना नेहवाल, इरफान पठाण यांनीसुद्धा ट्विटरवर विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments