Saturday, October 12, 2024
Homeमनोरंजनसचिनची कन्या दिसणार मिर्झापूर वेबसिरीजमध्ये

सचिनची कन्या दिसणार मिर्झापूर वेबसिरीजमध्ये

श्रिया पिळगांवकर ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक मुलगी असून तिने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एकुलती एक या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील कामाची सगळ्यांना प्रशंसा केली होती. तिने चित्रपटसृष्टीत येण्या आधी काही शार्ट फिल्मचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली होती. तसेच तिने काही इंग्रजी नाटकांमध्ये देखील काम केले होते. ती गेल्या वर्षी फॅन या चित्रपटात झळकली होती. फॅन या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटात आपल्याला ती नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच जय माता दी या तिच्या शॉर्ट फिल्मची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता ती मिर्झापूर या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मिर्झापूर या वेबसिरीजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिडवानी यांनी मिळून केली आहे. मिर्जापूर या वेबसिरिजमध्ये श्रियाची जोडी अली फझलसोबत जमणार आहे. अलीने फुर्के, बॉबी जासूस, हॅपी भाग जायेगी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वेबसिरिजमध्ये गँगस्टर ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या वेबसिरिजचे सगळे चित्रीकरण हे वाराणसीमध्ये होणार आहे. यात श्रिया आणि अलीसोबतच पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजविषयी श्रिया सांगते, मी मिर्झापूर या वेबसिरिजचा भाग झाल्याबद्दल प्रचंड खूश आहे. आम्ही वाराणसी मध्ये या वेबसिरिजचे चित्रीकरण करायला सुरुवात केली आहे. या वेबसिरिजमधील सगळेच कलाकार खूप चांगले असल्याने त्यांच्यासोबत काम करायला मला खूप मजा येत आहे. आजवर मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. मी आणि अली कॉलेज जीवनापासूनच खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तर एक वेगळाच आनंद मला मिळत आहे.

श्रियाने आजवर अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. शाहिद कपूरसोबत देखील ती एका जाहिरातीत झळकली होती.

आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक मुलगी असून तिने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एकुलती एक या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील कामाची सगळ्यांना प्रशंसा केली होती. तिने चित्रपटसृष्टीत येण्या आधी काही शार्ट फिल्मचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली होती. तसेच तिने काही इंग्रजी नाटकांमध्ये देखील काम केले होते. ती गेल्या वर्षी फॅन या चित्रपटात झळकली होती. फॅन या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटात आपल्याला ती नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच जय माता दी या तिच्या शॉर्ट फिल्मची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता ती मिर्झापूर या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मिर्झापूर या वेबसिरीजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिडवानी यांनी मिळून केली आहे. मिर्जापूर या वेबसिरिजमध्ये श्रियाची जोडी अली फझलसोबत जमणार आहे. अलीने फुर्के, बॉबी जासूस, हॅपी भाग जायेगी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वेबसिरिजमध्ये गँगस्टर ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या वेबसिरिजचे सगळे चित्रीकरण हे वाराणसीमध्ये होणार आहे. यात श्रिया आणि अलीसोबतच पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजविषयी श्रिया सांगते, मी मिर्झापूर या वेबसिरिजचा भाग झाल्याबद्दल प्रचंड खूश आहे. आम्ही वाराणसी मध्ये या वेबसिरिजचे चित्रीकरण करायला सुरुवात केली आहे. या वेबसिरिजमधील सगळेच कलाकार खूप चांगले असल्याने त्यांच्यासोबत काम करायला मला खूप मजा येत आहे. आजवर मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. मी आणि अली कॉलेज जीवनापासूनच खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तर एक वेगळाच आनंद मला मिळत आहे.

श्रियाने आजवर अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. शाहिद कपूरसोबत देखील ती एका जाहिरातीत झळकली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments