मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही जोडी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहते. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही ही जोडी हिट आहे. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या कपलनं गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये हजेरी लावली. यावेळी ट्रान्सपरन्ट ड्रेसमुळे तिला Oops Moment ला सामोरं जावं लागलं. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
अमेरिकेत पार पडलेल्या ७७ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये प्रियंका-निक जोनसने हजेरी लावली. हा समारंभ संपल्यानंतर या दोघांनीही आफ्टर पार्टीमध्ये सहभागी होण्याऐवजी कॅलिफोर्नियामध्ये डिनर प्लान केला होता. अवॉर्ड फंक्शनमधून निघाल्यानंतर प्रियांका-निकला फोटोग्राफर्सनी घेरलं. पण यावेळी प्रियांका तिच्या ड्रेसमुळे ऑकवर्ड फिल करताना दिसली. प्रियांकानं घातलेला हा ड्रेस एवढा ट्रान्सपरन्ट होता की फोटोग्राफर्सपासून बचाव करण्यासाठी तिनं आपल्या बॅगची मदत घेतली.
प्रियांकानं यावेळी फोटोग्राफर्सनी चुकीच्या अँगलमधून फोटो काढू नये यासाठी प्रियांकानं आपली बॅग समोर पकडत स्वतःचा बचाव केला. प्रियांकाच्या या बॅगची किंमत जवळपास ५ लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकाचे हे फोटो तिच्या इन्स्टग्राम फॅनपेजवरुन शेअर केले गेले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.