Tuesday, May 19, 2026
Homeमनोरंजनमलायकाने शेअर केला बोल्ड फोटो, सोहेलच्या पत्नीने केली ही कमेंट

मलायकाने शेअर केला बोल्ड फोटो, सोहेलच्या पत्नीने केली ही कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. मलायका सध्या चित्रपटात दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामूळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मलायकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत मलायका ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. मलायकाने हिरव्या-निळ्या रंगाच स्कर्ट परिधान केला आहे. मलायकाचा हा ड्रेस डिझायनर अर्पिता मेहताने डिझाइन केला आहे. मलाकाच्या या फोटोला ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव झाला आहे. फक्त चाहते नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खानने “OMG” अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता चंकी पांडेची पत्नी भावना पांडेने फायर इमोजी वापरत मलायकाला “हॉट” म्हटले आहे. सीमा खान आणि भावना पांडे या दोघी नेटफ्लिक्सवरील शो ‘द फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाइफ’मध्ये दिसल्या होत्या.

मलायका ‘इंडियाज बेल्ट डान्सर’ या शोची परिक्षक होती. करोनाची लागण झाल्यानंतर तिची जागा अभिनेत्री नोरा फतेहीने घेतली होती. करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मलायकाने धमाकेदार डान्स परफॉमन्स करत शोमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री केली होती.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments