जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. कोरोनाच्या या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपला वेळ घरातच घालवत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलेब्सही त्यांच्या होम स्टेचा आनंद लुटत आहेत. जनता कर्फ्यूनंतर रणवीर सिंगने त्याचे एक भयानक छायाचित्र शेअर केले आहे. क्वारंटाइनमधून बाहेर पडल्यानंतर आपली अशी अवस्था होईल, असे तो म्हणतोय.
रणवीर सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक छायाचित्र शेअर केले. यात रणवीर अतिशय भयानक दिसतोय. डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे, खांद्यापर्यंत वाढलेले केस आणि निस्तेज ओठ अशा काहीशा रुपात तो दिसतोय. हा फोटो शेअर करुन त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,’जेव्हा मी क्वारंटाइनमधून बाहेर पडेन.’
रणवीरचे भयानक रुपातील छायाचित्र आणि मजेशीर कॅप्शन बघितल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे सल्ले फनी कमेंट्स मिळत आहेत. उर्वशी रौतेला, आदिती राव हैदरी आणि दिया मिर्झा यांनीही त्याच्या फोटोवर कमेंट केले आहे. रणवीर सिंग ब-याच दिवसांपासून दीपिकासोबत त्याच्या घरीच क्वालिटी वेळ घालवत होता. त्याने न्युटेला खातानाही एक छायाचित्र चाहत्यांसह शेअर केले आहे. एका व्हिडिओमध्ये रणवीरने दाखवले की, त्याच्याकडे स्वतःचे नाव आणि प्रत्येक चित्रपटाच्या नावाचा न्युटेला बॉक्स आहे.