Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याकार्तिक आर्यनने या कारणासाठी घटवले आठ किलो वजन

कार्तिक आर्यनने या कारणासाठी घटवले आठ किलो वजन

Kartik Aaryan,Kartik, Aaryanअभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘लव्ह आज कल २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठीही त्याने लुकमध्ये विशेष बदल केला आहे. दिग्दर्शक इम्तियाज अलीने त्याला ‘लव्ह आज कल २’ मध्ये घेण्यापूर्वीच आठ किलो वजन कमी करावे लागेल, असे सांगितले होते. कार्तिकनेही इम्तियाजची हा अट मानन्य केली आणि लगेच वजन कमी करण्यास सुरुवात केली.

चित्रपटामध्ये तो रघु आणि वीरचे पात्र साकारत आहे. रघुचे पात्र ९० च्या दशकातील असून वीर आधुनिक युगातील मुलगा आहे. रघुचे पात्र शाळेत जाणारा मुलगा आहे. त्यामुळे कार्तिकने आपल्या केशरचनेतही बदल केला आहे, त्यामुळे तो शाळकरी मुलासारखा दिसेल. कार्तिकने या पात्रासाठी कठीण डायटिंग केली आणि जवळपास आठ किलो वजन कमी केले.

कार्तिक आर्यन ने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटोदेखील शेअर केला. त्यात तो आपल्या इतर सहकलाकारांसोबत शाळेच्या गणवेशात पोज देताना दिसत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल. याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments