मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आपले भविष्य आजमवायला येत असतात. अनेकजणी यशस्वी होतात तर कित्येकजणी काळाच्या पडद्याआड कधी गेल्या तेदेखील कळत नाही. बॉलिवूड पदार्पणानंतर छोट्यामोठ्या भूमिका करणारी मल्लिका शेरावत ही सौंदर्यवती अभिनेत्री मर्डर चित्रपटात झळकली. तिने पडद्यावर दाखवलेले अंगप्रदर्शन आणि अदा यामुळे ती एका रात्रीत प्रसिध्दीच्या झोतात आली. मल्लिकाचा काल तिचा ४० वा वाढदिवस साजरा झाला. तिच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगाचा वेध आपण घेऊयात.
मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा. बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना तिने आपले खरे नाव बदलले. आपल्या आईकडचे आडनाव मात्र तिने ठेवले. आईने तिच्यासाठी जे कष्ट केले त्याची आठवण म्हणून तिने असे केले.