Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनCoronavirus | कंडोमच्या विक्रीमध्ये झपाट्याने वाढ!

Coronavirus | कंडोमच्या विक्रीमध्ये झपाट्याने वाढ!

coronavirus lockdown increase in condom salesमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विषाणूबाधितांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. मात्र तर दुसरीकडे चित्र वेगळाचं आहे. कंडोमच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागील काही आठड्यापासून कंडोमची प्रचंड वाढ झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली असताना काही नागरिकांचा कंडोमच्या खरेदीकडे कल दिसून आला आहे. मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव यासारख्या सुविधा आठवडाभरापासून अधिक काळापासून बंद आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करण्याकडे अनेकांचा कलं आहे. मात्र मागील काही आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही आठड्यापासून कंडोमची विक्री वाढली आहे.

मागील काही आठवड्यांपासून मोठ्या आकाराची पाकीटं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्याचे औषध विक्रेते सांगतात. “सामान्यपणे लोकं तीन कंडोमचे पाकीट घेण्याला प्राधान्य देतात. मात्र मागील आठवडाभरापासून अधिक संख्येने कंडोम असणाऱ्या मोठ्या पाकीटांची मागणी वाढली आहे. 10 ते 20 कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे,” अशी माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments