मुंबई – मलायका अरोरा नुकतीच एका फॅशन इव्हेंटमध्ये स्पॉट झाली. यादरम्यान तिने सिलव्हर कलरचा व्ही-नेक गाऊन परिधान केला होता. त्यात तिचा लूक चांगलाच ग्लॅमरस दिसत होता. या ड्रेसबरोबर तिने स्काय ब्लू कलरचे ईअर रिंग्सही कॅरी केले होते. मलायकाशिवाय या इव्हेंटमध्ये लारा दत्ता आणि ‘बिग बॉस-10’ फेम लोपामुद्राही झळकली होती.
नवरी बनून अवतरली श्रीदेवी..
– श्रीदेवी नुकतीच बंगलोर टाइम्स फॅशन वीक २०१७ मध्ये पोहोचली होती.
– याठिकाणी अनेक फॅशन डिझायनर्सनी त्यांचे कलेक्शन सादर केले.
– यादरम्यान श्रीदेवीने डिझायनर मनीष मल्होत्राचा ब्रायडल लेहंगा परिधान करून वॉक करताना दिसली.
– नवरीच्या लेहंग्याबरोबर तिने हेवी ज्वेलरीही कॅरी केली होती. त्यांचे लूक आणखी गॉर्जियस दिसत होते.
– श्रीदेवीबरोबर याठिकाणी रँपवर बॅडमिंटन स्टार सायना नेहवालही नीता लुल्लाच्या ड्रेसमध्ये झळकली.