Sunday, May 10, 2026
Homeमुख्य बातम्यापुणे महानगरपालिकमध्ये नागरिकांना नो एन्ट्री

पुणे महानगरपालिकमध्ये नागरिकांना नो एन्ट्री

Pune Municipal Corporation Coronavirus,Pune Municipal Corporation, Coronavirus,Pune Coronavirusपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी प्रवेश बंदी केली आहे. पुणे मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे १६ रुग्ण आढळले असून खबरदारीसाठी निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळण्यात यावे यासाठी प्रशासनाने आवाहन केलं आहे. पुण्यामध्ये तीन दिवस दुकानं बंद ठेवन्यात आलं आहे. मुंबईसह इतर ठिकाणी धार्मिक स्थळं, उद्यानं बंद करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारीचं सर्व धार्मिक स्थळं आणि यात्रा, जत्रा बंद ठेवण्यात याव्यात अशी विनंती केली होती. स्वत: काळजी घ्यावी असंही आवाहन केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments