Sunday, May 10, 2026
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमहेश मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप

पुणे: दिग्दर्शक अभिनेते  महेश मांजरेकर यांच्याविरोधात पुण्यातील यवत पोलीसस्थानकात अदखलपात्र गुन्हा  नोंदवण्यात आला आहे. मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण  केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच महेश मांजरेकर यांनी पोलीसस्थानकात येण्यास नकार दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. शुक्रवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी घडलेली ही घटना आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून टेंभुर्णीला जाताना एक गाडी त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि त्या गाडीने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागे असलेली तक्रारदाराची गाडी समोरच्या गाडीला आदळली. यानंतर त्या गाडीतून महेश मांजरेकर आणि त्याचे साथीदार खाली उतरले आणि नुकसानभरपाईची मागणी करू लागले. यावेळी झालेल्या वादावादीत त्यांनी सदर तक्रारदाराला शिवीगाळ आणि मारहाणही केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

दरम्यान महेश मांजरेकर यांनी घटनेची आपली बाजू सांगताना म्हटले आहे की सदर तक्रारदाराच्या गाडीने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. ते तिघेही दारू प्यायलेले होते. याबद्दल जाब विचारताच त्यांनी अरेरावी केली. त्यांना उशीर होत होता म्हणून ते घटनास्थळावरून निघून गेले. त्यांनी असेही म्हटले आहे की या धडकेमुळे त्यांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे नुकसान झाले आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments