Sunday, April 12, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 988 नवीन कोरोनाबाधित; 60 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 988 नवीन कोरोनाबाधित; 60 रुग्णांचा मृत्यू

today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra-state
today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra-state

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (गुरूवार) दिवसभरात  8 हजार 988 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>राज्यात आज 8998 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6135 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2049484 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 85144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.66% झाले आहे.

सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार  १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये अनेक नागरिक कोरोना संपल्याच्याच आविर्भावात वावरत असल्याचं दिसून आलं आहे. असंच काहीसं चित्र मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनासंदर्भातली बदलती आकडेवारी डोळ्यांसमोर ठेवणं आवश्यक आहे.

एकीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित वाढू लागल्यामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले असताना मुंबईत देखील पुन्हा निर्बंध घालण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. गेल्या २४ तासांतली मुंबईतली आकडेवारी पाहिल्यास राज्य सरकार पुन्हा निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments