Tuesday, June 16, 2026
Homeमुख्य बातम्यासंकल्प : मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार - राजेश टोपे

संकल्प : मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार – राजेश टोपे

stay home, beat Corona - Rajesh Topeमुंबई : बुधवारी 25 मार्चला गुढी पाडवा आहे. हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा दिवस. मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार हा संकल्प करा आणि कोरोनाला हरवा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब आहे. सध्याच्या घडीला दोन रुग्ण आयसीयूत आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

पुणे – मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये…

पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायाचा आहे असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. गावात येणाऱ्या लोकांना अडवू नका असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत ते बंद करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments