Tuesday, May 19, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज ३,५५८ कोरोनाचे रुग्ण सापडले

महाराष्ट्रात आज ३,५५८ कोरोनाचे रुग्ण सापडले

मुंबई l महाराष्ट्रात  आज ३,५५८ नवे कोरोनाबाधित  रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे.

आज २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजच्या ३४ मृतांच्या संख्येमुळे कोरोनामुळं आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ५४,१७९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आजअखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे.

दरम्यान, ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आजअखेर १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments