Sunday, May 10, 2026
Homeमुख्य बातम्यास्वातंत्रवीर सावरकरांच्या विरोधात बोलणा-यांच्या मनात कचरा :  संजय राऊत

स्वातंत्रवीर सावरकरांच्या विरोधात बोलणा-यांच्या मनात कचरा :  संजय राऊत

shivsena mp Sanjay Raut,

मुंबई : काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात एका पुस्तिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. या पुस्तिकेमध्ये स्वातंत्रवीर सावरकर आणि नथुराम गोडसे विरुध्द आक्षेपहार्य लिखान करण्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना संजय राऊत यांनी या विषय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर महान होते आणि कायम राहतील. जे लोक त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्या मनात कचरा आहे. अशी टीका राऊत यांनी केली.

भोपाळमध्ये काँग्रेस सेवादल प्रशिक्षण शिबिरात वीर सावरकर या नावाच्या एका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले होते. या पुस्तिकेत सावरकर यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटना,प्रश्न,वादांबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुस्तिकेचे स्वातंत्रवीर आणि नथुराम यांच्याबाबत विधान करण्यात आले आहे. या प्रकरणी वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments