Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीत चिंतामणी ट्रॅव्हल्स् 50 फूट खोल दरीत कोसळली

रत्नागिरीत चिंतामणी ट्रॅव्हल्स् 50 फूट खोल दरीत कोसळली

रत्नागिरी l कशेडी घाटात तब्बल 50 फुट दरीत चिंतामणी ट्रॅव्हल्स् कोसळली. आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत कार्य सुरु आहे.

मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील 50 फुट दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहेत.

या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एक वृद्ध गाडीत अडकले.

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकांमधून तसेच शासनाच्या 108 रुग्णवाहिकांमधून 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments