Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्यामी काय धर्मांतर केलंय का? उध्दव ठाकरेंचा भाजपाला सवाल

मी काय धर्मांतर केलंय का? उध्दव ठाकरेंचा भाजपाला सवाल

Meeting of Uddhav Thackeray and Shiv Sena MPs at Matoshreeमुंबई :  मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रम्हवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये विविध प्रश्नांवर त्यांची भूमिका मांडली. उध्दव ठाकरे म्हणाले, आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा दावा कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही. असा टोलाही भाजपला लगावला. पुढे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, मी काय मागितले भाजपकडे? जे ठरले होते तेवढेच द्या. मी त्यांच्याकडे चांद तारे मागितले होते काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments