मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करणारा महत्त्वाचा बहुचर्चित सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड ) प्रकल्पाचा काम जोरदार सुरू आहे. त्याबाबत एक VIDEO मुंबई महानगरपालिकेनं शेअर केला आहे. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा दक्षिणेकडच्या भागाची झलक दाखवणारा हा व्हिडीओ आहे.
असा दिसेल कोस्टल रोड त्याची ही
झलक…मुंबईकरांनो! आपल्या स्वप्नातील मुंबईचा #DreamRoute सादर करीत असताना आम्हाला आनंद होत आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सीलिंकपर्यंत पसरलेल्या, भारताचा सर्वात निसर्गरम्य मार्ग #MumbaiCoasमहानगरपालिकेtalRoad च्या व्हर्च्युअल ड्राइव्हचा आनंद घ्या. #MyBmcCoastalRoadhttps://t.co/I6XnAJN4BW
— Mumbai Coastal Road Project (@mybmcCoastalRd) February 4, 2020
बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मंगळवारी मांडण्यात आला. यामध्ये कोस्टल रोडसाठी २००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २०२२ वर्षअखेरीपर्यंत या कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राइव्ह हा रस्ता खुला करण्याची डेडलाइन ठेवण्यात आली आहे.
या कोस्टल रोडचा दक्षिणेकडचा भाग मरीन लाइन्स भागातल्या प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होईल आणि बांद्रा वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकावर संपेल. १० किलोमीटरचा हा रस्ता ४ लेन्सचा असणार आहे. त्यातली एक लेन BRT आणि रुग्णवाहिकेसाठी असेल. या रस्त्यालगत १८०० गाड्यांची सोय होईल असे प्रशस्त पार्किंग लॉटही उभारण्यात येणार आहेत. चार ठिकाणी पार्किंगच्या जागा असतील. मुंबई महापालिकेनं यासंबंधी ट्वीट करत माहिती दिली आहे.
मरीन ड्राइव्ह, हाजीअलवी, अमरसन्स आणि वरळी असे चार भाग आणि चार ठिकाणी इंटरचेंजची सुविधा या प्रशस्त आणि शानदार कोस्टल रोडला असेल.
युती सरकारच्या काळात या कोस्टल रोडला परवानगी मिळाली होती. पण पर्यावरणाच्या हानीच्या कारणास्तव आणि काही नागरिकांच्या विरोधामुळे या कोस्टल रोडच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठल्यानंतर आता कोस्टल रोडचं काम जोरदार सुरू आहे.

