Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईVIDEO सिद्धार्थ शुक्लाने दारुच्या नशेत केली डिलिव्हरी बॉयला मारहाण

VIDEO सिद्धार्थ शुक्लाने दारुच्या नशेत केली डिलिव्हरी बॉयला मारहाण

मुंबई  l ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तो नशेच्या भरात एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

अलिकडेच सिद्धार्थने त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. मात्र, याच काळात सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द खबरी’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये सिध्दार्थने नशेच्या भरात एका डिलिव्हरी बॉयला मारहाण केली आहे. अंधेरीतील ओशिवारा या भागात ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

https://twitter.com/TheRealKhabri/status/1337661510269587456

बर्थ डे पार्टी संपल्यावर सिद्धार्थ घरी जाण्यासाठी रवाना झाला. मात्र, त्याच वेळी ओशिवारा या भागात त्याच्या कारला एका डिलिव्हरी बॉयच्या बाईकची धडक बसली.

त्यानंतर डिलीव्हरी बॉय व सिद्धार्थ शुक्ला यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर सिद्धार्थने थेट या मुलावर हात उचलत त्याला मारहाण केली.

रम्यान, या अपघातानंतर डिलिव्हरी बॉयने सिद्धार्थला चाकू दाखवत मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिद्धार्थने डिलिव्हरी बॉयवर हात उचलल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments