Monday, May 11, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईठाकरे सरकारचा दणका; फडणवीस,राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांसह इतर नेत्यांची सुरक्षा हटवली

ठाकरे सरकारचा दणका; फडणवीस,राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांसह इतर नेत्यांची सुरक्षा हटवली

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करुन चांगलाच दणका दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार,राम नाईक, नारायण राणे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments