Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईराजेश कुमार महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव, ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार...

राजेश कुमार महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव, ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला

मुख्य सचिव राजेश कुमार यांचा समृद्ध प्रशासकीय अनुभव, विविध महत्त्वाच्या पदांवर केली सेवा

rajesh kumar, ias, principal secretary, राजेश कुमार, मुख्य सचिव

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी महाराष्ट्राचे ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

मुख्य सचिव राजेश कुमार (भा.प्र.से. १९८८) यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६५ रोजी राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे झाला. २५ ऑगस्ट १९८८ रोजी भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी प्रवेश केला. इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.

राजेश कुमार यांनी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी म्हणून २४ जुलै १९८९ रोजी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीस प्रारंभ केला. त्यांच्या कारकिर्दीत सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव व जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, तसेच मंत्रालयातील पाणीपुरवठा, उद्योग, ग्रामविकास, सहकार व महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.

मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
मुंबई माणूस या मराठी डिजिटल न्यूज पोर्टलच्या एकूण संपादकीय व्यवस्थापन, सामग्री धोरण, प्रकाशन प्रक्रिया, दर्जा नियंत्रण आणि प्लॅटफॉर्म संचालनाची जबाबदारी प्रशासक खाते सांभाळते. विश्वासार्ह, जनकेंद्री आणि निष्पक्ष पत्रकारिता सुनिश्चित करणे हे या खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments