Monday, May 11, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई“हमाम में सब नंगे हैं ”, गडकरींना राऊतांचा टोला

“हमाम में सब नंगे हैं ”, गडकरींना राऊतांचा टोला

Nitin Gadkari - Sanjay Rautमुंबई : शिवसेना भगवा रंग भासवत असून ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे. अशी घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर केली होती. त्या टीकेला शिवसेना खासदार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. भाजपने काश्मिरमध्ये महेबूबा मुफ्तींसोबत युती केली होती. हे गडकरींना आठवत नाही. राजकारणात हमाम में सब नंगे हैं… यामुळे यावर न बोललं बरं असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

आज नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीससाठी प्रचारसभेत गडकरींनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर टीका केली होती. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. जम्मू काश्मिरच्या विभाजनाची गोष्ट करणार-या पाकिस्तानचे गुण गाणा-या पीडीपी सोबत भाजपने जम्मू काश्मिरमध्ये सत्तास्थापन केली होती. ते गडकरींना आठवत नाही का? जिनके घर शिशे के होते है, वह दुसरोके घर पत्थर फेका नही करते. ‘हमाम में सब नंगे रहते हैं’ हे राजकारणात लक्षात ठेवायंला पाहिजे, असाही टोला राऊत यांनी गडकरींना लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments