Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्यालिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट - भिंतीच्यामध्ये अडकून मृत्यू

लिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट – भिंतीच्यामध्ये अडकून मृत्यू

Mulund Liftman,Mulund, Liftman,Mulund Elevatorमुंबई : मुलुंडमध्ये मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवर या इमारतीत दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन १३ माळ्यावर लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होता. तर एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. मात्र हे काम सुरु असताना अचानक लिफ्ट सुरु झाली. त्यामुळे लिफ्टवरील कर्मचा-याचा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकून मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ च्या घडली.

लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. मात्र या दुर्घटनेत लिफ्ट टेक्निशियनचा मृत्यू झाला आहे. संजय यादव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवर या इमारतीत सकाळी ११ च्या सुमारास लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन १३ माळ्यावर लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होता. तर एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. मात्र हे काम सुरु असताना अचानक लिफ्ट सुरु झाली. त्यामुळे लिफ्टवरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला.

दरम्यान लिफ्टच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. पण तरी देखील विकासकाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments