Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याअहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं : आ.रोहित पवार

अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं : आ.रोहित पवार

Rohit Pawarमुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. भारत पाकिस्तान अशा प्रकारे दिल्लीमध्ये प्र अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं आहे.अंहकाराला कोणीच समर्थन देऊ शकत नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राने एका नव्या पायंड्याची सुरुवात केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत प्रचारासाठी भाजपाचे १२ मुख्यमंत्री गेले होते. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्रीही तिथे गेले होते. काही पदाधिकारीही तिथे जाऊन बसले होते. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आमित शाहदेखील होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. पण तरीही सर्वसामान्यांनी जो कौल दिला आह त्याचा खूप आनंद आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“लोकसभेत नरेंद्र मोदींच्या बाजूने लोकांनी अनपेक्षित कौल दिला होता. त्यावेळी काही वेगळी कारणं होती. निवडणुकीच्या काही महिन्यांपुर्वी हल्ला झाला होता. लोक भावनिक होते. त्याचा फायदा त्यांना घेतला जे चुकीचं होतं. लोकांच्या दैनंदिन समस्यांवर बोललं पाहिजे. त्या सोजवल्या जाणं जास्त महत्त्वाचं आहे,” असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments