Sunday, May 10, 2026
Homeमुख्य बातम्याअखेर दीपिका पदुकोणच्या 'छपाक'चा मार्ग मोकळा

अखेर दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’चा मार्ग मोकळा

Chhapaak Deepika Padukone,Chhapaak, Deepika, Padukone,Copyrightमुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइट कसा होऊ शकतो, असा सवाल मुंबई हायकोर्टानं उपस्थित केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची केलेली मागणी मागे घेतली.

दीपिका सध्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारीत आहे. दिपिकाने ५ जानेवारीला अॅसिड हल्ला पीडित तरुणींसोबत वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे दरवर्षी दीपिका तिचा वाढदिवस रणवीर सिंगसोबत साजरा करते. पण यावेळी तिने वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. मेघना गुलजार यांनी ‘छपाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments