Monday, August 17, 2026
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसची बदनामी करणाऱ्या संबित पात्राला कायदेशीर धडा शिकवणार !: नसीम खान

काँग्रेसची बदनामी करणाऱ्या संबित पात्राला कायदेशीर धडा शिकवणार !: नसीम खान

मुंबई पोलीस आयुक्त, साकीनाका पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Sambit Patra Arif Naseem Khan,Sambit Patra, Arif Naseem Khan,Sambit, Patra, Arif, Naseem, Khan,Sambit Patra Naseem Khan, Naseem Khanमुंबई : भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा देऊन मुंबई पोलीस आयुक्त, साकीनाका पोलीस स्टेशन तसेच निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी सांगितले आहे.

संबित पात्राचा समाचार घेताना नसीन खान पुढे म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने अत्यंत हीन पातळी गाठली असून पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. एका जुन्या व्हिडिओची कसलीही शहानिशा न करता संबित पात्रानी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर करुन काँग्रेस पक्ष व आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात तेढ निर्माण होऊन त्याचा फायदा व्हावा हा त्यांचा कुटील हेतू यामागे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसच्या एका स्वयंसेवकाने समाजमाध्यमावर प्रसारित करुन आपली व काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करुन संबंधित व्यक्तीवर कारवाईही करण्यात आली होती तसेच समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेला तो व्हिडिओ खोटा असून मुळ व्हिडिओची मोडतोड करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. असे असतानाही मानसिक विकृत्तीतून पुन्हा भाजपाने हा खोटा व्हिडिओ प्रसारित केला आहे, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments