skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन संजय निरुपम खवळले; म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन संजय निरुपम खवळले; म्हणाले…

congress-former-mp-sanjay-nirupam-maharashtra-cm-uddhav-thackeray-hindutva
congress-former-mp-sanjay-nirupam-maharashtra-cm-uddhav-thackeray-hindutva

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना हिंदुत्व, शेतकरी, महागाई, स्वातंत्र्य लढा यावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाहिजे जातीचे येरेगाबाळे न कामाचे ही ओळ ऐकवली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले अशी आठवण करुन देत शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही अशा शब्दात समाचार घेतला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन काँग्रेस पक्षाचे नेते,माजी खासदार संजय निरुपम यांनी नाराजी जाहीर केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे? अशी संतप्त विचारणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केली आहे. संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी पाडल्याचा आनंद साजरा केला आणि तिथे उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे?”.

संजय निरुपम यांनी यावेळी, “हे ओवेसींच्या विषारी झाडाला खतपाणी घालण्यासाठी पुरेसं नाही का?,” अशी विचारणादेखील केली आहे.

काय बोलले उद्धव ठाकरे…
“तुम्ही बाळासाहेबांची आठवण वेळोवेळी काढलीत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे, किमान तुम्ही त्यांना तरी विसरला नाहीत. विसरला नसाल तर त्याचं हिंदुत्व लक्षात ठेवा. त्यांचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नव्हतं. बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले. एकटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. “काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांसह सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाचे हिंदुत्व भ्रष्ट झालेले असून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही,” असं ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments